शेती म्हणजे काय वो..!!
जगण्याचा पाया म्हणजे शेती म्हणलं तर काही वागव ठरणार नाही, भूक लागली की पावलं आपोआप घरातील टोपल्याकडे जातात अन् त्यातील भाकरी खाऊन जे मन तृप्त होतं ना त्यालाच शेती म्हणतात. सृष्टी ला बनवणाऱ्याने कायम शेतीलाच महत्त्व दिलय माणसाचं संपूर्ण आयुष्य शेतीभवतीच ठेवलंय माणसाला जगायला लागणारी प्रत्येक गोष्ट शेतीपासूनच अन् शेतीलाच जोडलेली आहे पण माणसाला याचा विसर पडायला लागलाय अन् हाच विसर माणसाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारा आहे. विकासाच्या नावाखाली माणसाने कधीच कोणत्या गोष्टीचा समतोल राखला नाहीये का...