पेरू शेतीचे भविष्य…!!
मी जेव्हा पेरू लावला कीव्हा पेरू शेती मध्ये काम करत आहे तेव्हा पासून सगळ्यात पहिला आणि सगळ्यांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न…मी पेरू मध्ये काम करायला चालू केलं तेव्हा पूर्ण मार्केट चा अभ्यास करून हे तर लक्षात आलं की ज्या पेरूला फोम बॅग लावून उत्पादन घेतले जाते त्याचा भाव कधीच ३० रुपये च्या खाली आला नाही मग मी त्याच बेसिस वर शेतकऱ्यांना आणि स्वतः ला ३० रुपये ची कमिटमेंट द्यायला चालू केली, आज पर्यंत पहिला बहर सरासरी ३७ रुपये जागेवर, दुसरा बहर सरासरी ५५ रुपये, तिसरा बहर सरासरी ३२ रुपये, चौथा बहर सरासरी ७० रुपये सर्व दर हे जागेवर मिळालेले आहेत…चारही बहराची सरासरी काढली तर ४८.५ रुपये प्रती किलो भाव जागेवर मिळाला आहे मला आणि माझ्या शेतकऱ्यांना…सरासरी पहिल्या बहरालाच आपण १५ किलो पेक्षा जास्त प्रती झाडाला उत्पादन घेतले आहे…वरील सगळे बहर चालू असताना खूप साऱ्या आणि जास्त लागवडी झाल्या आहेत पण पेरू शेती प्रत्येकालाच जमली आहे असे नाही ९०% शेतकरी फक्त अनुदान आणि दुर्लक्ष यात फेल आहेत त्यामुळे ज्याला खरच सर्वोच्च उत्पादन घेऊन पेरू शेती करायला जमणार आहे त्यानेच पेरू च्या भानगडीत पडावे…टनाने माल काढता आला की शेती परवडतेचं…भविष्य ज्यांना लई अवघड वाटतं ते इतिहास नाही घडवू शकत..!!🙏
मागचे ३ वर्ष कितीही लागवडी वाढल्या तरी भाव ३० च्या खाली आला नाही अन् मला तरी वाटतं नाही भाव कमी होतील…!!🤗
ज्यांना टनेज काढता आले तेच पेरू शेतीत टिकलेत.😀
बाकी सर्व गोष्टींचा अन् स्वतः च्या मनाचा विचार करून निर्णय घ्यावा..!!🙌
अधिक माहिती साठी
Reesh Agro Farms: 7057942074