विश्वास म्हणजेचं: Reesh Agro Farms..!
Reesh Agro Farms Pvt. Ltd सामान्य कुटुंबातून येऊन अती सामान्य परिस्थिती मध्ये खूप मोठं मोठाली स्वप्नं घेऊन सुरु केलेली कंपनी, सगळ्यात आधी स्वतःच च्या शेतात काम करायचं अनुभव घ्यायचा आणि मगच शेतकऱ्यांसोबत काम करायच हा बेसिक नियम घेऊन अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर आज पर्यंत शेतकऱ्यांसोबत काम केलंय, ज्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून दम धरून माझ्यासोबत काम केलं त्यामध्ये असा १ ही शेतकरी नाही ज्यांना पैसे मिळाले नाहीत, आज हजारो लाखो चाहते वेटिंग ला आहेत पण मला जेवढं जमतं झेपत तेवढचं काम मी करतो कारण सगळं काही मला अन् अक्षय लाच बघावं लागत. पण पुढील ३ महिन्यामध्ये मला याच्यात बदल करायचा आहे, कंपनी च प्रशस्त ऑफिस १००+ एम्प्लॉई आणि कमीत कमी रोज २०० लोकांना ट्रेनिंग देता येईल यासाठी मी आज पासुनच काम चालू केलंय. मला प्रत्येक पिका मध्ये काम करायचंय, अन् शेतकऱ्यांना पैसे कमावून द्यायचेत. आज पर्यंत बोललोय तसं झालं नाही असा कधीच अनुभव नाही. पेरू मध्ये लास्ट ३ वर्षात माझा माल कधीचं भाव पडलेल्या परिस्थितीत आला नाही, या वेळेस पण माझ्या शेतकऱ्यांनी शेवट ४५ रुपये किलोने माल विकून हंगामाची सांगता केली आहे, आता माझ्या सोबत जोडलेल्या येकही शेतकऱ्याचा प्लॉट चालू नाही. मी कायम शेतकऱ्यांना रिझल्ट देत आलोय. शेती करायची म्हणलं की विश्वास खूप महत्त्वाचा, तो असेल तर शेतीत यशस्वी होता येत. बाकी जे ओरडतात ते काही करत नसतात हे कायम लक्षात ठेवा. मी माझं काम चोख बजावत राहणार. भविष्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणीसाठी कॉल सेंटर, शेती क्षेत्रात शिक्षण घेतलेल्यांसाठी रोजगार, माल खरेदी विक्री ची व्यवस्था, खूप कमी भावात ब्रँडेड खते औषधे आणि प्रत्येक शेतकऱ्याला शिकायचं असेल काहीतर नवीन करायचं असेल तर शनिवार रविवार प्रशिक्षण.✌🏻हे सगळं चालू करतोय १ जानेवारी २०२५ पासून, मी या शेती क्षेत्राचा चेहरा मोहराचं बदलून टाकणार अन् हेच माझं ध्येय आहे..!!❤️☘️✌🏻
धन्यवाद.
रविराज साबळे-पाटील